‘गिलऐवजी रोहित सोबत ‘या’ फलंदाजाला सलामीला पाठवा’ ; माजी प्रशिक्षकाचा सल्ला

गिलऐव

इंग्लंड : भारतीय संघ तीन महिन्याच्या दौऱ्यासाठी इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. येत्या १८ ते २२ जुन दरम्यान भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. या सामन्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंड संघासोबत पाच कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे.

या स्पर्धेच्या आधी भारतीय संघाला जास्त सरावाला जास्त वेळ मिळणार नाही परंतु  न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. न्यूझीलंडच्या संघाला अंतिम सामन्यात फायदा होईल असे अनेकांना वाटत आहे. मात्र, अंतिम सामन्यापूर्वी काही दिवस कसोटी सामने खेळल्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना थकवा जाणवू शकेल, असे मत न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन यांनी व्यक्त केले.

तसेच त्यांनी  अंतिम सामन्यात भारताने रोहित शर्मासोबत सलामीला शुभमन गिलऐवजी मयांक अगरवालला संधी दिली पाहिजे, असेही म्हंटले आहेत. भारतीय संघ अंतिम सामन्यात सलामीला रोहित आणि शुभमन गिल यांची निवड करेल असे मला वाटते. मात्र, त्यांनी मयांकला संधी देण्याचा विचार त्यांनी केला पाहिजे. कारण मयांकला न्यूझीलंडच्या गोलंदाजांना न्यूझीलंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. त्याचा हा अनुभव भारतीय संघासाठी फायदेशीर ठरेल, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

IMP