fbpx

‘नम्रता आणि सज्जनता याचं उदाहरण असलेल्या संग्रामला लोकसभेत पाठवा’- आव्हाड

टीम महाराष्ट्र देशा : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ वाळकी इथे जितेंद्र आव्हाड यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी संग्राम जगताप यांना बहुमताने लोकसभेत पाठवा असं आवाहन मतदारांना केलं आहे.

तसेच त्यांनी सुजय विखेंवर जोरदार टीका केली. ‘ज्येष्ठांचा अपमान करणारं कारटं लोकसभेत जाता कामा नये, अशा शब्दात त्यांनी सुजय विखे यांच्यावर तोफ डागली. पुढे बोलताना त्यांनी ‘नम्रता आणि सज्जनता याचं एक उदाहरण म्हणून समोर असलेले आमदार संग्राम जगताप यांना लोकसभेत बहुमताने निवडून द्या’ अस आवाहन उपस्थित मतदारांना केलं.

दरम्यान, नगरमध्ये भाजपचे सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांच्यात चुरशीची लढत होतं आहे. या लढतीकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.