राहुल गांधींना मोहेंजोदडोला पाठवा, ते तिथलेच पंतप्रधान होऊ शकतात- संबित पात्रा

sambit

नवी-दिल्ली : ‘टाइम्स नाऊ’ वाहिनी वरील ‘सवाल पब्लिक का’ या कार्यक्रमात लाईव्ह चर्चेदरम्यान अँकर आणि पत्रकार नविका कुमारने काँग्रेस नेते गजेंद्र सिंह साखला यांना एक प्रश्न विचारला तेव्हा त्यांच्या उत्तरावरून भाजपा नेता संबित पात्रा यांनी त्यांची खिल्ली उडवली.

नविकाने साखला यांना प्रश्न विचारला की, ‘तस्लीम रहमानी यांचं म्हणणं आहे तशीच काँग्रेसची विचारसरणी आहे का? तुम्हीही त्या विचारसरणीशी सहमत आहात का जी म्हणते या देशाची निर्मिती मुघलांनी केली आहे, बाबररने केली आहे? काँग्रेस पक्ष याच्याशी सहमत आहे का?. यावर उत्तर देत साखला म्हणाले की, ‘मोहेंजोदडोच्या काळात दगडातून आग निर्माण केली जात होती आम्ही असं मानतो. त्यावेळी तितका विकास झाला नव्हता असं तुम्हीच मानतता. गेल्या सात-साडे सात वर्षांपासून भाजपाचे हे प्रवक्त वारंवार काँग्रेसने काहीच काम केलेलं नाही असे सांगतात.’

दरम्यान, साखला यांच्या उत्तरावरुन संबित पात्रा प्रत्युत्तर देत म्हणाले की, “काँग्रेस मोहेंजोदडोमध्ये काय करत होती? मला हे समजत नाही आहे. राहुल गांधी मोहेंजोदडोमधून आले आहेत का? काय बोलत असता तुम्ही साखला साहेब. तुमचे म्हणणं पूर्ण कधी होणार, चर्चा संपायला आली आहे. मोहेंजोदडो, राहुल गांधी, काँग्रेसवादी कमाल आहे. मोहेंजोदडोलाच पाठवा राहुल गांधींना, ते तिथलेच पंतप्रधान होऊ शकतात’ असे म्हणत त्यांनी काँग्रेसला खोचक टोला लगावला.

महत्त्वाच्या बातम्या