उस्मानाबाद : भाजपाच्या लोकसभेच्या जागा मागण्याच्या खेळीने सेनेत खळबळ!

तुळजापूर : उस्मानाबाद लोकसभेची जागा सेनेकडे असताना भाजपा ने अचानकपणे ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपल्याकडे घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुन हालचाली सुरु केल्याने सेना-भाजपा मध्ये सर्व काही आलबेल आहे या बाबतीत साशंकता व्यक्त केली जात आहे.भाजपाच्या या खेळीमागे काय राजकारण दडलंय या बाबतीत अनेक तर्क वितर्क काढले जात आहे,

उस्मानाबाद लोकसभा निवडणूकी साठी कांँग्रेस राष्ट्रवादीकाँग्रेस आघाडी ऐकञित पणे मतदारांसमोर जात असताना ऐन निवडणूकीच्या तोंडावर इकडे उस्मानाबाद लोकसभेची जागा सेनेकडून भाजपाकडे घेण्यासाठी भाजपातील पदाधिकारी सक्रीय झाल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे.उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात भाजपापेक्षा शिवसेनेचे प्राबल्य आहे ऐक आमदार दोन नगर पालीकांसह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत सदस्य शिवसेनेचे आहेत तर भाजपाकडे आ. सुजितसिंह ठाकुर हे ऐकमेव्य आमदार आहेत .

सेनेचे विधमान खासदार प्रा रवि गायकवाड मागील निवडणूकीत दोन लाख मताने विजयी झालेले आहे असे असताना भाजपाने लोकसभेची ही जागा आपल्या कडे मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे काय कारण याची चर्चा चविष्टतेने चर्चिली जात आहे या भाजपाच्या खेळी मागे काय राजकारण आहे या बाबतीत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

लवकरच जिल्हयातील भाजपा पदाधिकारी मुखमञी फडणवीस भेटुन जिल्हयात भाजपाने केलेले विकास कामे व जिल्हयात भाजपाचे बळ वाढल्याचा दावा करीत सेनेकडून भाजपा कडे देण्याची मागणी करणार आहेत. उस्मानाबाद जिल्हयातील आगामी विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी तर ही खेळी खेळली गेली नाही ना असा प्रश्न निर्माण होत आहे.

https://www.youtube.com/watch?v=ZDYSgivQ3pU&t=6s

2 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...