दानवेंनी युती नाही तर जावईधर्म पाळला, निकालाआधीच युतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप

Raosaheb_Danve

टीम महाराष्ट्र देशा: औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत झाल्याने चुरस पहायला मिळत आहे, कधीकाळी शिवसेनेत असणारे आ हर्षवर्धन जाधव यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली, त्यामुळे शिवसेनचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, निवडणुकीचा निकाल जाहीर पूर्वीच शिवसेना भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

Loading...

अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव हे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत, दानवे यांनी युतीधर्म न पाळता जाधव यांना मदत केल्याचा आरोप खा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. खैरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत दानवेंची तक्रार केली आहे.

शिवसेना नेते अर्जुन खोतकर जालन्यामधून रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लढणार होते, मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खोतकरांची ब्न्द्खोरी रोखली. दानवे यांनी मात्र हर्षवर्धन जाधव त्यांचे जावई असताना देखील त्यांना आवरल नाही. दानवे यांना खुश करण्यासाठी औरंगाबादमधील काही भाजप नगरसेवकांनी जाधव यांचे केले आहे, अशी तक्रार चंद्रकांत खैरे यांनी केली.Loading…


Loading…

Loading...