सेना-भाजप पदाधिकाऱ्यांनी केली औषधीभवनजवळील पुलाची पाहणी; आठ दिवसात काम सुरु कराण्याच्या दिल्या सूचना

औरंगाबाद : दलालवाडीतील औषधीभवनच्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम करण्याकरिता तातडीने नाल्यातील कचरा काढा. यासह आठ दिवसात पुलाच्या कामाला सुरूवात करा. अशा सूचना आमदार प्रदीप जैस्वाल यांनी दिल्या आहे. त्यांच्यासोबत यावेळी भाजपचे माजी नगरसेवक अनिल मकरीये यांची हि उपस्थिती होती.

राज्य शासनाने शहरातील रस्त्यांसाठी १५२ कोटीचा निधी मंजूर केला. ही रस्त्याची कामे एमआयडीसी, एमएसआरडीसी आणि मनपा मार्फत केली जात आहे. एमएसआरडीसीमार्पâत सात रस्त्यांची कामे सुरू असून त्यामध्ये औषधी भवनच्या नाल्यावरील पुलाच्या कामांचा समावेश करण्यात आलेला आहे. पुलाच्या कामाला सुरूवात करताच औषधीभवनच्या नाल्यातील तुंबलेला कचरा बाहेर आला. हा कचरा नाल्यामध्ये गच्च बसलेला आहे. त्यामुळे पाणी येताच त्यासोबत कचरा देखील वाहून येत आहे. महापालिकेने मात्र नाल्यातील कचरा काढताना दोन्ही बाजूनी असलेल्या नाल्यावरील इमारतींच्या स्लॅबखाली असलेला कचरा काढला नाही.

त्यामुळे पुलाचे बांधकाम करण्यास अडचणी येत आहे. पुलाचा पाया खोदताना पाणी आणि कचरा आल्याने कंत्राटदाराने काम थांबवले. या संदर्भात नागरिकांनी आमदार प्रदीप जैस्वाल यांना माहिती दिली. यानंतर जैस्वाल यांनी शनिवारी नाल्याची पाहणी केली. यावेळी मनपाचे शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता संजय काकडे, उपअभियंता नामदेव गाडेकर, कंत्राटदार आदींची उपस्थिती होती. आमदार जैस्वाल यांनी नाल्याची पाहणी करून नाल्यातील व स्लॅबखाली तुंबलेला कचरा मनपाने तातडीने काढून घेत पाण्याला रस्ता मोकळा करून द्यावा. कंत्राटदाराने पुलाच्या पायाभरणीच्या कामाला सुरूवात करावी अशी सूचना केली. त्यानुसार कंत्राटदाराने आठ दिवसात कामाला सुरूवात करण्याची तयारी दर्शवली.

महत्त्वाच्या बातम्या