मराठ्यांच्या चिघळलेल्या आंदोलनाला सेना भाजप सरकार जबाबदार

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. मराठा आरक्षण बद्दल सरकार गंभीर नाही तर मुख्यमंत्र्यांनी बेताल वक्तव्य करणं चुकीचं असून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणी अशोक चव्हाण यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत केली आहे.

या चिघळलेल्या आंदोलनाला सेना भाजप सरकार जबाबदार पण आंदोलकांनी शांततेच्या मार्गानं आंदोलन करावं. सामन्य माणसांना आंदोलनाचा त्रास होऊ नये असे आवाहन अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केले.

सेना भाजप सरकारचा कोणत्याही व्यक्ती पुढे आला नाही. मराठा मोर्चाची सरकारनं नीट दखल घेतली नाही. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी बेताल वक्तव्यं करून आंदोलन चिघळवले होते.  मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी बेताल वक्तव्यं करू नये. मुख्यमंत्री यांनी  चर्चेपेक्षा कृती करावी, त्याची गरज आहे.  मराठा आरक्षणाच्या मुद्धावर एक दिवसाचे विशेष अधिवेशऩ बोलवावं असे अशोक अशोक चव्हाण यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले.

शांतता व संयम राखून समाजविघातक, धर्मांध शक्तींचा कुटील डाव हाणून पाडाः खा. अशोक चव्हाण

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या

  • मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
  • मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
  • राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
  • आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
  • मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
  • अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
  • आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.