पांडुरंगासोबत सेल्फी घेणे आता थांबणार, पंढरपुराच्या मंदिरात आता मोबाईल बंदी

टीम महाराष्ट्र देशा : पंढरपूर – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पावित्र राखण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मंदिरात मोबाईल नेण्यावर बंदी घालण्यात आली असून याची अंमलबजावणी 1 जानेवारीपासून म्हणजे नवीन वर्षा पासून करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.

विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शनासाठी दररोज राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिरांमध्ये मोबाईल सह भाविकांना प्रवेश असल्याने भाविक दर्शन रांगेमध्ये आणि विठ्ठला समोर सेल्फी घेताना आढळून येतात.त्यामुळे दर्शनासाठी इतर भाविकांना वेळ लागतो.

तसेच यामुळे वादावादी निर्माण होत असल्याने मंदिर समितीने मंदिरात मोबाईल न सोडण्याचा निर्णय घेताला असून भाविकांना मोबाईल ठेवण्यासाठी समितीकडून सोय करण्यात येणार असल्याची माहिती जोशी यांनी दिली आहे.

दरम्यान सध्या सेल्फिचा जमाना असल्याने अनेक भाविक मंदिरांमध्ये दर्शनाला आल्यानंतर देवा सोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मंदिर व्यवस्थापनावर परिणाम होतो. यामुळेच दक्षिणेतील अनेक मंदिरांनी देखील मंदिरात मोबाईल नेण्यास बंदी घातली आहे.

महत्वाच्या बातम्या