बंदुकीबरोबर सेल्फी काढणे आठ वर्षीय मुलाला पडले भारी

गाझियाबाद : बंदूक हातात धरून सेल्फी काढण्याचा प्रकार उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे एका आठ वर्षाच्या मुलाला भारी पडला. जुनेद असे या मुलाचे नाव आहे. सेल्फी काढताना मोबार्इलचे बटण दाबण्याऐवजी चुकून बंदुकीचा ट्रिगर दाबला गेल्यामुळे जुनेदच्या डोक्यात गोळी लागली.

जुनेदला तातडीने दिल्लीच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याची स्थिती अत्यंत नाजूक आहे. जुनेदच्या शेजारी राहणारा काळे हा पूर्वी अवैधपणे सशास्त्रांचा व्यापार करत होता. ही बंदूकदेखील त्याचीच होती. त्यामुळे पोलिसांनी काळेला ताब्यात घेतले असून काळेकडे ही बंदूक का होती, याबाबत पोलीस तपास करत आहे.

Comments
Loading...