शरद पवारांसोबत सेल्फिसाठी काहीही….

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत सेल्फिसाठी काहीही..असाच काहीसा प्रसंग लातूर विमानतळावर पाहायला मिळाला. शरद पवारसोबत सेल्फी घेण्याच्या नादात तरुण चक्क आपले समानचं विमानतळात विसरल्याचा प्रसंग घडला.

शरद पवार नुकतेच विमानतळावरून चालले होते. शरद पवार यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह न आवरल्याने लातूरच्या तरुणाने आपल्या जवळील सामानाकडेही दुर्लक्ष केले व शरद पवारांसोबत चालत चालत त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला . अखेर, त्याच्या या प्रयत्नांना यश आले पण या गडबडीत तो चक्क त्याचे सामानच एअरपोर्टवरील सिटींग रुममध्ये विसरला असल्याचे लक्षात आले.

शेवटी, सेल्फी घेतल्यानंतर आपल्या सामानाची आठवण झाल्यानंतर तो सिटींग रुमकडे सामान घेण्यासाठी गेला, पण तेथील सुरक्षा रक्षकांनी त्यास अडवले. त्यामुळे तो तरुण हताश झाला होता. त्यावेळी, त्याने शरद पवारांकडे पाहिले अन् पवारांनी हात उंचावून सुरक्षा रक्षकाला खुनावले. सुरक्षा रक्षकानेही पवारांचा इशारा लक्षात घेऊन त्या तरुणाला सिटींग रुममध्ये सामान घेण्यासाठी पुन्हा आतमध्ये जाऊ दिले.

या तरुणाचे नाव परेश मार्कंडेय असे आहे त्याने याबात फेसबुकवरून पोस्ट करत आनंद व्यक्त केला व झाल्या प्रसंगाची माहिती त्याने दिली. समान विसरल्यामुळे पवारांच्या आदेशानंतर काही वेळातच एक अधिकारी माझे विसरलेले सामान घेऊन आमच्याकडे धावत आला. शरद पवार हे इतके मोठे नेते असूनही त्यांचे जमिनीवर पाय आहेत हे मी आज अनुभवले. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे त्यांचे बारीक लक्ष असते. सर्वसामान्य माणसांच्या अडचणी त्यांना लगेच समजतात असे परेश मार्कंडेय म्हणाला.