राधे माँचा चक्क पोलीस ठाण्यातच भरला दरबार

police suspened-self-styled-god-woman-radhe-ma-welcomed-at-vivek-vihar-police-station

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँ पुन्हा एकदा वादात अडकली आहे. राधे माँने विवेक विहारमधील पोलीस ठाण्यात ‘प्रकट’ झाली. इतकंच नाही तर राधे माँने थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसली. इतकंच नाही तर या पोलीस ठाण्याचा अधिकारी संजय शर्मा राधे माँ समोर हात जोडून उभा राहिला. नवरात्र उत्सवाच्या काळात राधे माँ पोलिस ठाण्यात आली होती, यावेळी एसएचओ संजय शर्मा यांनी तिला चक्क आपली खुर्ची बसायला दिली. इतकंच नव्हे तर त्यांनी राधे माँचा आशीर्वादही घेतला.

राधे माँने प्रसाद म्हणून संजय शर्मा यांच्या गळ्यात ओढणीही टाकली. त्यांच्या टेबलवर फुलांच्या पाकळ्या पसरलेल्या आहेत. तर पोलिस स्टेशनमधील काही कर्मचारीही भक्तांच्या मुद्रेत दिसत आहेत. ही सगळी दृश्यं व्हायरल झाल्यानंतर आता स्पष्टीकरण देताना दिल्ली पोलिसांना कसरत करावी लागत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिस उपायुक्तांमार्फत या प्रकरणाची चौकशी होणार आहे.

राधे माँवर हुंड्यासाठी छळ, लैंगिक छळ आणि धमकी देणं असे अनेक गंभीर आरोप आहेत.Loading…
Loading...