गर्दी जमवून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त स्वयंरोजगार कार्यशाळा; कोरोनाचे नियम धाब्यावर

औरंगाबाद : नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस झाला. शहरात त्या निमित्त बुधवारी शिवसेनेने तापडिया नाट्यगृहात महिलांच्या स्वयंरोजगार निर्मितीवर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी मोठ्याप्रमाणात जाहिरातीही करण्यात आल्या होत्या. कार्यक्रमस्थळी अक्षरश: गर्दीचे लोण उठले होते. तसेच कोरोना काळातील नियमाना आयोजकांसह शिवसैनिकांनी धाब्यावर बसविल्याचे चित्र होते.

एकीकडे महाराष्ट्रावर तिसऱ्या लाटेचे सावट येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगत असताना. दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नेतेमंडळीसह कार्यकर्ते देखील वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करून कोरोना संसर्गाला आमंत्रण देत असल्याचे चित्र आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाला शासनाकडून ५० टक्के उपस्थितीत परवानगी असताना, बुधवारी तापडिया नाट्यगृह मात्र, ७० ते ८० टक्के भरले होते. यामुळे सत्ताधाऱ्यांना वेगळा कायदा लागू झाला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, पोलिसांचा बंदोबस्त या कार्यक्रमस्थळी लावण्यात आला असताना, पोलिसांना देखील गर्दीची कल्पना आली आहे. मात्र, सत्ताधारी पक्षांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांचाहि काढता पाय असतो. त्यामुळे या कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल होईल का? अशी चर्चा शहरात जोर धरत होती. तर कार्यक्रमस्थळी महिलांना, ने – आण करण्यासाठी आयोजकांनी खास गाड्या कामाला लावल्या होत्या. त्यामुळे मुंबईहून आलेली नेते मंडळी खुश होणार असल्याने अनेकांचे चेहरे चमकत होते.

महत्त्वाच्या बातम्या