मुंबई : भारतात सध्या सुरु असलेली सईद मुश्ताक अली टी२० स्पर्धा युवा खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे गाजत आहे. या स्पर्धेतील बुधवारी(१३ जानेवारी) पार पडलेल्या मुंबई विरुद्ध केरळ सामन्यानंतर देखील २६ वर्षीय युवा खेळाडू मोहम्मद अझरुद्दीन चांगलाच चर्चेत आला. त्याने या सामन्यात केवळ ३७ चेंडूत शतक पूर्ण केले आहे. याबरोबरच त्याने काही खास विक्रमही केले.
याखेळी अझरुद्दीनने काही खास विक्रम केले आहेत. तो ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करताना सर्वोच्च खेळी करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी ल्यूक राईटने नाबाद १५३ धावांची खेळी २०१४ मध्ये ससेक्सकडून एसेक्सविरुद्ध धावांचा पाठलाग करताना केली होती.
याबरोबरच ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये सर्वात वेगवान शतक करणारा तो तिसऱ्या क्रमांकाचा भारतीय फलंदाज ठरला असून त्याने युसुफ पठाणची बरोबरी केली आहे. ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये सर्वात जलद शतक करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर रिषभ पंत आहे. पंतने दिल्लीकडून हिमाचल प्रदेशविरुद्ध सईद मुश्ताक अली टी२० स्पर्धेत खेळतानाच सन २०१८ ला ३२ चेंडूत शतक केले होते. तर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. रोहितने २०१७ साली श्रीलंकाविरुद्ध भारताकडून खेळताना ३५ चेंडूत शतक केले होते.
मोहम्मद अझरुद्दीन याने केलेल्या धडाकेबाज खेळीचे भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने कौतुक केले. वाह, अझरुद्दीन बेहतरीन! मुंबईसारख्या संघाविरुद्ध अशी खेळी करण्यासाठी बरीच मेहनत लागते. अझरुद्दीनने 54 चेंडूंत 137 धावा फटकावून एकहाती सामना फिरवला. त्याचा खेळ पाहून आनंद झाला, असे सेहवागने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Wah Azharudeen , behtareen !
To score like that against Mumbai was some effort. 137* of 54 and finishing the job on hand. Enjoyed this innings.#SyedMushtaqAliT20 pic.twitter.com/VrQk5v8PPB
— Virender Sehwag (@virendersehwag) January 13, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदी, मोठे व्हा !’ सामना अग्रलेखातून पंतप्रधान मोदींना आव्हान…
- चर्चा तर होणारच! ३७ चेंडूत शतक करून अझरुद्दीने मिळवले दिग्गज्यांच्या पंगतीत स्थान
- नांदेडात वाळू माफियांवर मोठी कारवाई ; वीस वाहने केली जप्त
- कोरोना प्रतिबंधक लस लातुरात दाखल ; शनिवारपासून लसीकरण
- थोरातांनी उभे केलेले सहकाराचे मॉडेल सर्व राज्यांसाठी उपयुक्त; छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक