श्रीलंका दौऱ्यातील ‘या’ खेळाडूंच्या कामगिरीवर सेहवाग नाराज, म्हणाला…

मुंबई : भारतीय संघाचे प्रमुख खेळाडू हे इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे भारताने श्रीलंका दौऱ्यात इतर खेळाडूंना संधी देण्यात आली होती. या दौऱ्यात प्रामुख्याने खेळाडूंचे दोन गट होते. एक गट होता नवीन युवा खेळाडंचा ज्यांना पदार्पणाची संधी मिळणार होती. तर दुसरा गट होता अपयशी खेळाडूंचा जे वाईट कामगिरीमुळे संघाबाहेर झालेले होते.

या दौऱ्यात एकदिवसीय मालिकेत युवा खेळांडूनी चांगली कामगीरी केली मात्र अनुभवी खेळाडू म्हणावी तशी कामगिरी करु शकले नाही. याच अनुभवी खेळाडूंच्या कामगीरीवर भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने नाराजी व्यक्त केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना सेहवागने श्रीलंका दौऱ्यातील मनिष पांडे आणि हार्दिक पांड्या या दोन खेळाडूंवर नाराजी बोलुन दाखवली. दुबळ्या आणि अनुभवाची कमतरता असलेल्या श्रीलंकेच्या संघासमोर या दोघांना चांगल्या धावा करण्याची चांगली संधी होती. मात्र या दोन्ही खेळाडूंनी ही संधी गमावली. असे सेहवाग म्हणाला.

मनिष पांडेने श्रीलंकेविरुद्धच्या तिन्ही सामन्यात २४.६७च्या सरासरीने ७४ धावा केल्या. यात एकही अर्धशतक झळकावले नाही. तर क्षेत्ररक्षणात दोन झेलही त्याने सोडले. तर हार्दिकने दोन सामन्यात केवळ १९ धावा केल्या. तर गोलंदाजीत त्याने केवळ २ गडी बाद केले. त्यामुळे आगामी एकदिवसीय मालिकेत त्याला संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.

महत्त्वाच्या बातम्या