टीम महाराष्ट्र देशा: गेल्या अनेक वर्षांमध्ये देशात बायोपिक चित्रपटांच्या निर्मितीचे प्रमाण वाढत चालले आहे. यामध्ये बॉलीवूड अग्रेसर असून अनेक बायोपिक चित्रपट दरवर्षी प्रदर्शित होत आहेत. कारण या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन वरून प्रेक्षकांना अशा पद्धतीचे चित्रपट बघण्यात रस आहे ही बाब निर्माते लक्षात घेऊन हे चित्रपट प्रदर्शित करत आहे. अशा परिस्थितीत बॉलीवूडनंतर सगळीकडेच बायोपिकचा ट्रेंड सुरू झाला आहे. बायोपिक चित्रपट निर्मितीचा वादळ सध्या आपल्या शेजारच्या देशांमध्ये म्हणजेच पाकिस्तानमध्ये वाहायला लागले आहे. कारण सध्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी माजी क्रिकेट खेळाडू शोएब अख्तर (Shoeb Akhtar) याच्या ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ (Rawalpindi Express) या बायोपिकची चर्चा सुरू आहे.
दंगल, एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी, भाग मिल्खा भाग यासारख्या चित्रपटानंतर क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंच्या आयुष्यावर आधारित बॉक्स ऑफिसवर हमखास चालतात असे म्हणायला हरकत नाही. दरम्यान, रावळपिंडी एक्सप्रेसच्या निमित्ताने यामध्ये आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. या चित्रपटांमध्ये पाकिस्तानी अभिनेता उमर जैस्वाल क्रिकेटपटू शोएब अख्तर याची भूमिका साकारणार आहे. त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.
उमर जैस्वाल यांनी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत लिहिले आहे की, “रावळपिंडी एक्सप्रेस या चित्रपटाच्या निमित्ताने मला मोठ्या पडद्यावर दिग्गज क्रिकेटपटू शोएब अख्तर याची भूमिका साकारणं हे माझ्यासाठी खूप अभिमानस्पद आहे. अल्लाहच्या आशीर्वादाने आम्हाला या प्रयत्नामध्ये नक्की यश मिळेल. त्याचबरोबर आम्ही तयार करत असलेला हा बायोपिक जागतिक स्तरावर नाव कमवेल अशी देखील आम्हाला आशा आहे.”
Shoeb Akhtar | 'रावळपिंडी एक्सप्रेस'चे पाहिले पोस्टर रिलीज, 'हा' अभिनेता करणार शोएब अख्तरची भूमिकाhttps://t.co/7qeTPtwZjz
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) November 17, 2022
चित्रपटाच्या पोस्टरमध्ये दाखवल्याप्रमाणे उमर पाठमोरा उभा असून त्याने क्रिकेटपटू शोएब अख्तरची 14 नंबर असलेली जर्सी परिधान केलेली आहे. रावळपिंडी एक्सप्रेस या चित्रपटाची पार्श्वभूमी 1975 ते 2000 या वर्षांमध्ये असणार आहे. कारण क्रिकेटपटू शोएब अख्तर 90 च्या दशकांमध्ये त्याच्या करिअरच्या शिखरावर होता. त्याच्या वेगवान गोलंदाजीच्या कौशल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला लोक रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखतात. त्यानंतर हेच नाव त्याची ओळख बनल्यामुळे त्याच्या बायोपिकला हे नाव देण्यात आलेले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Rahul Gandhi | “राहुलजी गांधी, तुमच्या आज्जीने सावरकरांचं पत्र वाचलं नव्हतं का?…”, हिंदू महासंघ आक्रमक
- Uddhav Thackeray | “शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा बाजार मांडू नका”, उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांवर भडकले
- IPL 2023 | गंभीर दुखापतीनंतर RCB मध्ये परतणार ‘हा’ अष्टपैलू खेळाडू
- Rahul Gandhi PC | “मै आपका नौकर रहना चाहता हूँ”, सावरकरांचे पत्र फडणवीसांनी वाचावं; राहुल गांधी वक्तव्यावर ठाम
- Rahul Gandhi PC | मराठीत प्रश्न विचारा, मराठी समजते – राहुल गांधी
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले