आदित्य ठाकरेंची तत्परता पाहून मनसेच्या आमदारानी मानले आभार, म्हणाले…

raju patil

मुंबई : डोंबिवलीत प्रदूषणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून आहे. या ठिकाणी जल आणि वायू प्रदूषणाच्या तक्रारी नागरीकांकडून करण्यात येतात. आज पुन्हा त्याचाच प्रत्यय आला. डोंबिवलीतील गांधीनगर परिसरातून वाहणाऱ्या नाल्यातून हिरव्या रंगाचं पाणी जोरोने वाहू लागले. या हिरव्या रंगाचा नाला पाहून नागरीकांनी त्याच्या विरोधात आवाज उठविला. काही नागरिकांनी या हिरव्या रंगाचा नाल्याचे व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केले. त्यामुळे संबंधित व्हिडीओ प्रचंड व्हायरलही होत आहेत.

संबंधित नाल्याच्या व्हायरल व्हिडीओजची दखल कल्याण पूर्व ग्रामीणचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी काल घेतली. त्यांनी ट्विटरवर याबबतचा व्हिडीओ शेअर करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना या प्रकरणात लक्ष केंद्रीत करण्याची सूचना केली होती. त्यानंतर काही वेळातच आदित्य ठाकरे यांनी देखील संबंधित कंपनीवर कारवाई करण्यात आल्याने केमिकेलचे पाणी नाल्यात सोडण्याचा प्रकार थांबल्यानंतर नाल्यातील पाण्यात झालेल्या बदलाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

आदित्य ठाकरेंची हि तत्परता पाहून आमदार राजू पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे जाहीर आभार मानले आहेत. डोंबिवलीमध्येप्रदूषण करणाऱ्या कंपनीवर कारवाई झाल्यानंतर राजू पाटील यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरेंचे आभार मानले आहेत. राजू पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ‘डोंबिवलीतप्रदूषण करणाऱ्या कंपनीवर त्वरित कारवाई केल्याबद्दल नियंत्रण बोर्ड व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार. यापुढे पण प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध अशीच त्वरित व कठोर कारवाई होईल हीच अपेक्षा’ असं पाटील यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP