स्वतःच्या घराचं वीज बिल पाहून भज्जी म्हणाला…

harabhajan singh

मुंबई : एकीकडे लॉकडाउनमुळे सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडले असताना अवाच्या सवा दराने वीज बिल येत असल्याने महावितरण विरोधात राज्यभरात संताप आहे. वाढीव वीज बिलाचा फटका फक्त सर्वसामान्यच नाही तर सेलिब्रेटींनाही बसत असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्री तापसी पन्नू, अभिनेत्री रेणुका शहाणे, अभिनेता अर्शद वारसी यांच्या सोबत आता क्रीडा विश्वातील एका खेळाडूने पण ट्विट करत आश्यर्य व्यक्त केल आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग सोशल मीडियावर सातत्याने अॅक्टीव्ह असतो. यावेळी मात्र भज्जीने मुंबईतील आपल्या घराच्या वीज बिलासंदर्भात ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे. हरभजन सिंगने ट्विट करत म्हणाला, ‘एवढं बील. संपूर्ण कॉलनीचं लवलं का? नॉर्मल बिलापेक्षा 7 पट अधिक??? व्वा.’ असं लिहिलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील नागरिकांच्या घराचे वीज बील मोठ्या प्रमाणावर वाढून येत आहे. हरभजन सिंगने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या मुंबईतील घराचे वीज बील तब्बल 33,900 रुपये एवढे आले आहे. यावर त्याने नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी अनेक सेलेब्रिटीजनी आपल्या घराच्या वीज बिलासंदर्भात सोशल मीडियावरून वीज वितरण कंपन्यांवर निशाणा साधला आहे.

मदतीचे व्हिडीओ काढण्यासाठी आजीला पुन्हा तेच तेच करून दाखवायला लावत आहात, लाज वाटायला हवी – दिग्दर्शक केदार शिंदे संतापले

मुंबईची लोकल सुरु करू पण….आयुक्त इकबाल चहल यांची भूमिका

मुंबईत शिथिलता दिली तर कोरोनाबाधितांची संख्या वाढेल : उद्धव ठाकरे