रुपालीचे फोटोतील सौंदर्य पाहून नेटकरी म्हणाले ‘प्रीटी वूमन’

रुपालीचे फोटोतील सौंदर्य पाहून नेटकरी म्हणाले ‘प्रीटी वूमन’

rupali

मुंबई : अभिनयासोबतच ती तिच्या डान्समुळे प्रसिध्द असलेली ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री रुपाली भोसले. तिच्या सौंदर्य आणि अभिनयावर चाहते नेहमीच आकर्षित होतात. तसेच रुपाली ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ‘बिग बॉस मराठी २’ नंतर तर तिची लोकप्रियता आणखीनच वाढलेली दिसते. त्यामुळे तिचे फोटो सोशल मीडियावर सतत शेअर करत असते. आता देखील तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान रुपालीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही मोहक फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने अत्यंत सुंदर असा गुलाबी रंगाचा ड्रेस घातला असून, त्यावर तिने चंदेरी रंगाची मोठी ओढणी घेतली आहे. सोबतच तिने तिचे सगळे केस मोकळे सोडले, कानात सुंदर असे ईअरिंग घातले आणि कपाळी एक छोटीसी टिकली लावली आहे. या फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर, लक्षवेधी आणि सोज्वळ दिसत आहे. ती ओढणीसोबत वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.

तिच्या चाहत्यांना देखील तिचा हा लूक खूप आवडला असून या फोटोवर किती ब्युटीफूल दिसतेय, सुंदरच , ‘प्रीटी वूमन’ यासह अनेक कमेंट केल्या आहेत. रुपाली भोसलेने अनेक मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये आणि चित्रपटात काम केले आहे. तिने ‘बडी दूर से आये है’, ‘दोन किनारे दोघी आपण’, ‘चांदी’, ‘मुक्ती’ यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत काम करत आहे. मात्र तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या