हार्दिक पंड्या बाप होणार हे पाहून नताशाचा एक्स बॉयफ्रेंड म्हणाला…

Hardik - Natasha

मुंबई : भारताचा अष्ठपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने नुकतीच एक गोड बातमी दिली आहे. हार्दिक लवकरच बाप होणार आहे. ही गोड बातमी त्याने स्वत: सोशल मीडियावरून दिली आहे. यानंतर हार्दिक आणि नाताशावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आव्हानांवर मात करताना धीरोदात्तपणे पुढे जाण्याचा शिवरायांचा बाणा आज मार्गदर्शक ठरतो आहे

सोशल मिडीयावर फोटो शेअर करताना हार्दिकने घरच्या घरी लग्न केल्याचाही फोटो शेअर केला आहे, पण त्याबद्दल त्याने माहिती दिली नाही. हार्दिक पंड्याने नव वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्बियन मॉडेल-अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविकबरोबर साखरपुडा केला होता.

सर्बियामध्ये जन्मलेल्या नताशाने वयाच्या तिसऱ्या वर्षी नृत्य शिकायला सुरुवात केली होती. १७ व्या वर्षी तिने मॉडर्न स्कूल ऑफ बॅलेमध्ये प्रवेश घेतला. २०१० मध्ये मिस स्पोर्ट्स सर्बियाचा पुरस्कार जिंकल्यानंतर अभिनय आणि नृत्य यात करिअर करण्याचा निर्णय घेतला. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने २०१२मध्ये बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले.

सीमावादावर तोडगा काढण्यासाठी भारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये महत्वाची बैठक

बिग बॉसच्या आठव्या पर्वातून तिला खरी ओळख मिळाली. काही दिवसांपूर्वी झालेल्या नच बलिये या कार्यक्रमात नताशा आपला एक्स बॉयफ्रेंड एल. गोनीबरोबर दिसली होती. हार्दिक आणि नताशा यांची गूड न्यूज गोनीलही समजली आहे.

गोनीने ही गोड बातमी ऐकल्यावर आपली प्रतिक्रीयाही दिली आहे. गोनीने या बातमीनंतर इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहीली आहे. या पोस्टमध्ये, तुम्हा दोघांनाही देवाकडून भरभरून आशिर्वाद मिळोत, असे गोनीने म्हटले आहे.