महेंद्रसिंह धोनीचा लुक पाहून गुलशन ग्रोवर म्हणाले, ‘माझ्या व्यवसायावर लाथ मारु नको’

dhoni

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी जेवढा मैदानावरील चौकार आणि षटकारासाठी ओळखला जातो तेवढाच तो त्याच्या सुपर कूल हेअरस्टाईलसाठी देखील ओळखला जातो. कॅप्टन कूल माही इंडियन प्रीमियर लीग सुरू होण्यापूर्वी पुन्हा एकदा चर्चेत आला. यावेळी त्याने आपल्या हेअरस्टाईलन सर्वांचे लक्ष वेधले आहे. मात्र बॉलिवूडचे ‘बॅड मॅन’ अभिनेते गुलशन ग्रोवर यांनी महेंद्रसिंह धोनीचा नव्या लूकमधील फोटो शेअर करत एक ट्वीट केले आहे. यावरून त्यांची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

गुलशन ग्रोवर यांनी धोनीचा हा फोटो शेअर करत ट्वीटमध्ये लिहिले की, ‘माही खूप छान लूक आहे. कृपया डॉनच्या भूमिकेसाठी ऑफर आली तर ती स्विकारु नकोस. माझ्या व्यवसायावर लाथ मारु नकोस. पहिलेच माझे तिन भाऊ संजय दत्त, सुनिल शेट्टी आणि जॅकी श्रॉफ ते करत आहेत जेणेकरुन मी बाहेर पडावे. आलिम हाकिम तुझ्याकडे बॅड मॅन येत आहे’ या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे. धोनीच्या या नवीन लूकचे फोटो हेअरस्टाइलिस्ट अलीम हकीमने शेअर केले आहेत.

गुलशन ग्रोवर यांचे ट्वीट सध्या चांगलेच व्हायरल होत असून यावर लाइक आणि कमेन्टचा वर्षाव होत आहे. काही दिवसांपूर्वी माहीने वजन कमी केले होते, त्यानंतर त्याचा फोटो व्हायरल झाला. त्यावेळी देखील त्याच्या लूकची चर्चा झाली. आता पुन्हा एकदा धोनी त्याच्या हेअरस्टाईलमुळे चर्चेत आला आहे.

महत्वाच्या बातम्या