fbpx

मनसेचा बॉम्ब फुटला, ठाण्यात केले ‘सीड बॉम्बचे’ वाटप

टीम महाराष्ट्र देशा : राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना बॉंब वाटप करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून स्रुरू होती. मनसेने ठाण्यात बॉंब चे वाटप केले. मनसे कोणते बॉंब वाटप करणार याची उत्सुकता सर्वांना होती दरम्यान मनसेने ठाण्यात सीड बॉम्बचे वाटप केले.

देशाची आजची परिस्थिती बघता मनसेचे बॉम्बवाटप’ असे शीर्षक असलेले बॅनर मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी प्रसिद्ध केले होते. दरम्यान, मनसे बॉम्बवाटप करणार आहे. म्हणजे नेमका कुठला राजकीज धमाका करणार याची उत्सुकता निर्माण झाली होती. बॉम्ब वाटपाच्या या फेसबुक पोस्टनंतर अभिजीत पानसेंनी प्रतिक्रियाही दिली होती.’हो आम्ही बॉम्ब वाटणार आहोत. लवकरच तारीख जाहीर करू, तेव्हा प्रत्यक्षच या’, असं ते म्हणाले होते.

मनसेने ठाण्यात बॉम्ब वाटप करणार असल्याचा गाजावाजा केला त्यामुळे मनसेचा बॉम्ब नेमका कुठला? याबाबत लोकांनी उत्सुकता बाळगली होती. मनसे बॉम्ब वाटप करणार असल्याने पोलिसांनीही मोठा बंदोबस्तही लावला होता. इत्केच्च नव्हे तर कोण आला रे कोण आला मनसे चा बॉम आला अशा घोषणाही उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या होत्या. दरम्यान संध्याकाळी मनसेचा बॉम्ब फुटला.

मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी मनसेच्या नौपाडा येथील मध्यवर्ती कार्यालयात ठाणेकरांना सीड बॉम्बचे वाटप केले. तर राज्यातील आणि देशातील दुष्काळाची परिस्थिती पाहता आता पावसाळ्याच्या दिवसात सीड बॉम्ब झाड लावण्यासाठी असलेले बी चे वाटप केले असल्याचे पानसे यांनी म्हंटले.