मुंबईच्या महापौरांचा अजब दावा म्हणे यंदा ‘मुंबईत पाणी तुंबलंच नाही !’

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या 24 तासात मुंबईत रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली आहे. मुंबई आणि परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईतल्या अनेक भागात पाणी साचलं असून तिन्ही रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूकही विस्कळीत झाली आहे. अशातच शहरात पाणी तुंबलंच नाही, असा हास्यास्पद आणि अजब दावा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे.

‘पहाटेपासून धुवाधार पाऊस पडतोय. सकाळी तर पाऊस थांबतो की नाही, असं चित्र होतं. काही भागात पाणी साचलं होतं, पण अद्यापही कुठे पाणी तुंबलेलं दिसत नाही’, अशी प्रतिक्रिया महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे. याचबरोबर, ते म्हणाले, पालिकेनं काम चांगलं केलं आहे, त्यामुळे पाणी साचलं नाही. शहरात ठिकठिकाणी पालिका कर्मचारी आणि अधिकारी तैनात आहेत.

दरम्यान, दादर, लोअर परळ, माहिम, वांद्रे भागात पावसाचा जोर चांगलाच आहे. दक्षिण मुंबईतील कुलाबा, फोर्ट परिसरात पावसाचा जोर असून, अनेक भागांत ट्रॅफिक जामचे चित्रही दिसत आहे.

You might also like
Comments
Loading...