‘दि सारी स्टोरी’ सईचा मराठमोळा अंदाज पहा फोटोज…

SAE TAMHANKAR

मुंबई : मराठी फिल्म इंडस्ट्री मधील सई ताम्हणकर आपल्या अभिनयाने व ड्रेसिंगने नेहमीच चर्चेत असते. मराठी इंडस्ट्री मध्ये काम करूनही सईने आपल्या फॅशनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले व आपली एक वेगळी ओळख देखील निर्माण केली.

मराठी सिनेसृष्टीमध्ये आपल्या अभिनयासोबत आता तिने फॅशनिस्टा सई ‘दि सारी स्टोरी’ हे आपलं स्वत:चं लेबल घेऊन आली आहे. सईने नुकतेच या साडी मध्ये आपल्या इंस्टग्राम अकाउंट वर फोटोज शेअर केले आहे. या मराठमोळा अंदाजाने सईने पुन्हा एकदा चाहत्यांचे मन जिंकले आहे.

आपल्या वेगळ्या भूमिकेतून आथवा निवडक भूमिका साकारून सई नेहमीच आपले वेगळेपण दाखवते. तसेच या ब्रँडच्या साडी मध्ये देखील वेगळेपण असणार आहे. ‘दि सारी स्टोरी’ लेबल  श्रुती भोसले आणि सई ताम्हणकर या दोघींचा आहे. सईने आता अभिनयानंतर फॅशन इंडस्ट्री मध्ये पदार्पण केले आहे.

महत्वाच्या बातम्या