नवरात्रोत्सव : बघा कोल्हापूरच्या अंबाबाईची दुसऱ्या माळेची खास रूपातील पूजा

ambabai

कोल्हापूर : कालपासून शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली आहे. राज्यभरात यंदा कोरोनाच्या सावटामुळे सण, उत्सवांवर बंधन असल्यानं काहीसा उत्साह कमी असला तरी भाविक शक्य तसे मनोभावे हे उत्सव साजरे करत आहेत. या काळात आदिशक्तींची पूजा देशभरात केली जाते.

महाराष्ट्रात तुळजापूर, कोल्हापूर, वणी आणि माहूर या साडेतीनशक्तिपीठांमध्ये पारंपरिक पद्धतीने हा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या काळात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश व इतर राज्यातील लाखो भाविक देवीचे मनोभावे दर्शन घेत असतात. मात्र या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे मंदिरे उघडलेली नाहीत. या उत्सव काळात देवींचे सर्व धार्मिक विधी पार पडणार असल्याचे देवस्थान समितींमार्फत असून भाविकांना देवींचे दरवर्षीप्रमाणे दर्शन घेता येणार नाही. मंदिर व्यवस्थापनांनी भक्तांसाठी ऑनलाइन दर्शनाची सोय करून दिली आहे.

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करवीरनिवासिनी अंबाबाईची विविध रूपात पूजा बांधली जाते. या रूपानं पौराणिक महत्व देखील असते. तर देवीची मंदिर परिसरात निघणारी पालखी हे खास वैशिष्ट्य असत. यंदा भक्तांना मंदिरात जात येत नसलं तरी हे सर्व धार्मिक विधी इतर ऑनलाईन माध्यमातून पाहता येणार आहे. आज नवरात्रोत्सवाचा दुसरा दिवस आहे. यानिमित्ताने अंबाबाईची आज घोर तो करणाऱ्या पराशरांना महाविष्णुस्वरूपातील पूजा साकारण्यात आली आहे. ही पूजा माधव मुनिश्वर व मकरंद मुनिश्वर यांनी बांधली आहे.

बघा आजचे अंबाबाईचे खास मनमोहक रूप –

महत्वाच्या बातम्या-