‘आरोग्य सेवेत मानवी चुका सहन झाल्या तर पाहा..’, मंत्री मुंडेंचा अधिकाऱ्यांना इशारा

धनंजय मुंडे

बीड : नागरिकांचे जीव वाचविण्यात मानवी चुका समोर आल्या तर कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा पालकमंत्री धनंजय मुंडेयांनी अंबाजोगाईत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. मंत्री मुंडे यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि माजलगाव तालुक्यातील तेलगाव ट्रामा केअर सेंटरला भेटी दिल्या.

अंबाजोगाईत रुग्णसंख्या, उपलब्ध व शिल्लक बेड, रेमडेसिव्हिर इंजेक्शनची वितरण प्रक्रिया, ऑक्सिजन पुरवठा आदींबाबत माहिती घेऊन आणखी ५० ऑक्सिजन बेड वाढविण्याच्या सूचना मुंडे यांनी दिल्या. यावेळी आमदार संजय दौंड, माजी आमदार पृथ्वीराज साठे इत्यादी उपस्थित होते.

स्वारातीमधील स्पेशालिस्ट व अन्य डॉक्टरांची किमान दोन दोन तासांची सेवा लोखंडी येथील रुग्णालयास उपलब्ध करून द्यावी असेही त्यांनी सुचविले. येथील विद्युत पुरवठ्याच्या कामात बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार कारणीभूत असल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

मुंडे यांनी तेलगावच्या ट्रामा केअर सेंटरला भेट देऊन ५० ऑक्सिजन बेडचे कोविड हॉस्पिटल उभे करण्याची सूचना केली. तसेच परळी येथील ग्रामीण रुग्णालयात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ५० ऑक्सिजन बेडच्या कोविड रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. २५ ऑक्सिजन बेड कार्यान्वित करण्यात आले असून, आणखी २५ बेडला ऑक्सिजन सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या