जम्मू : जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात काल गुरुवारी दहशतवाद्यांनी तहसीलदार कार्यालयात घुसून काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यावर गोळी झाडली. माजी मुख्यमंत्री आणि जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी या काश्मिरी पंडिताच्या हत्येवरून मोदी सरकारवर टीका केली. अल्पसंख्याकांना सुरक्षा देण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे ते म्हणाले. आता काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या पत्नीने देखील गंभीर आरोप केला आहे.
“धोका असूनदेखील पती राहुल भट्ट यांना सुरक्षा देण्यात आली नसल्याचे आरोप राहुल भट्ट यांच्या पत्नीने केला. दहशतवाद्यांना तिथे राहुल असल्याचे कसं कळलं? सगळे राहुल यांना चांगले म्हणायचे. ते रस्त्यातून जाताना सर्वाना नमस्कार करायचे. सर्व राहुलला म्हणायचे तुझ्याशिवाय बडगाम अपूर्ण वाटते. मी राहुल यांच्याशी हल्ल्याच्या १० मिनिटांपूर्वी बोलले. मला माहित नव्हते की, १० मिनिटांनंतर त्यांना गोळ्या घातल्या जातील”.
खांद्याला गोळी लागल्याचे प्रथम कळले. मला वाटलं, खांद्याची एक बाजू जाईल, काहीही झालं तरी मी करेन. पाय गेले तरी मी काही ना काही केले असते. पण त्याला जीव गमवावा लागला. मी आता एकटीच राहिली आहे. माझ्यासोबत कोणीच नाही आहे. राहुलच माझं सर्वस्व होतं. राहुल भट्ट यांच्यासोबत सुरक्षा कर्मचारी नव्हते,असेही त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या –