सुरक्षा रक्षकानेच चोरली ‘श्री तुळजाभवानी’ मंदीरातील दानपेटीतून रक्कम

तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदीरातील आरती करण्याच्या ठिकाणा जवळील दान पेटीतुन रक्कम काढल्या प्रकरणी मंदीराच्या खाजगी सुरक्षा रक्षका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना रविवार दि. २९ रोजी पहाटे १२:५५  वाजता घडली असुन या प्रकरणी गुन्हा मंगळवारी दाखल करण्यात आला आहे.

या बाबतीत अधिक माहीती अशी की, कोरोना पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदीर भक्तांना प्रवेश बंद असल्याने मंदीर भाविकांविना सुनसान आहे.या संधीचा फायदा घेवुन आरती करण्याच्या ठिकाणाजवळील दानपेटीतून खाजगी सुरक्षारक्षक उमेश सतिश शिराळकर रा. वडगाव लाख ता. तुळजापूर याने दान पेटीतील ११६० रुपयाची रक्कम तारेच्या सहाय्याने काढुन घेतली.

दरम्यान हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत दिसुन आल्याने मंदीर पर्यवेक्षक शाहुराज माने यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन या सुरक्षारक्षका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस करत आहे.

हेही पहा –