हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर चाकणमध्ये कलम 144 लागू

पुणे: मराठा आरक्षणासाठी आज चाकणमध्ये बंद पुकारण्यात आला होता, या बंद दरम्यान अनेक गाड्या फोडण्यात आल्या आहेत. तर दगडफेकीची घटना देखील घडली आहे. या सर्व घटना पाहता शहरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.

मराठा आरक्षणासाठी आज चाकणमध्ये बंद पुकारण्यात आला होता, यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी अनेक गाड्यांची तोडफोड केली आहे, तसेच एसटी बसला देखील आग लावण्यात आली आहे. ही सर्व परिस्थिती पाहता पोलिसांकडून संपूर्ण शहरात कलम 144 लावण्यात आले आहे,

जमावबंदी आदेश देण्यात आल्याने नागरिकांना जमावाने फिरण्यास बंदी असणार आहे, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी हे आदेश दिले आहेत.

You might also like
Comments
Loading...