मराठा क्रांती मोर्चाचे दुसरे पर्व ! आता मूक मोर्चा नाही, तर ठोक मोर्चा

पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समजाला आरक्षण दिले जाईल. असे आश्वासन  दिले होते. मात्र सरकाराने गेल्या १० महिन्यात आरक्षणासंदर्भात कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारला जागे करण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरणार आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अनुदानाचे काय झाले?आरक्षण, शेतकरी कर्जमाफी, कोपर्डी प्रकरण, शिवस्मारक या सर्व प्रश्नाचे उत्तर मराठा समाज मुख्यमंत्र्यांना विचारणार आहेत.

तुळजापूरमध्ये २९ जूनला जागरण गोंधळ घालून मराठा क्रांती मोर्चाचे दुसरे पर्व सुरू करण्यात येईल. यावेळेस मूक मोर्चा नाही, तर ठोक मोर्चा असेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.

You might also like
Comments
Loading...