fbpx

सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सिझनची पहिली झलक

टीम महाराष्ट्र देशा- अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या नेटफ्लिक्सच्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजच्या पुढील भागांचा टीझर प्रदर्शित झाला आहे.अनुराग कश्यप दिग्दर्शित सेक्रेड गेम्स या वेबसिरीजमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी, सैफअली खान, राधिका आपटे यांच्या मुख्य भूमिका आहेत. धार्मिक पार्श्वभूमीवर घडणारी वेबसिरीज जितकी लोकप्रिय ठरली तितकीच ती वादग्रस्तही ठरली आहे.

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची ‘सेक्रेड गेम्स’ मालिकेत बदनामी करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारास अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी, नेटफ्लिक्स व सेक्रेड गेम्सचे निर्माते जबाबदार आहेत,’ असं काँग्रेस कार्यकर्ते राजीव सिन्हा यांनी तक्रार देखील केली होती. त्यामुळे पुढील भाग येणार की नाही अशी शंका निर्माण झाली होती.

अखेर टीझर प्रदर्शित झाल्याने पुढील भाग येणार हे निश्चित झाले आहे. पण याचा पुढचा भाग पाहण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल, कारण अद्याप दुसऱ्या भागाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.