कचर्‍यासाठी मनपाने शोधल्या 102 खुल्या जागा

कचरा

औरंगाबाद- शहरातील कचराकोंडीला महिना पूर्ण झाला आसुन नगर विकास सचिव मनीषा म्हैसेकर यांनीदेखील औरंगाबादेत बैठक घेऊन झोननिहाय कचर्याची विल्हेवाट लावण्याच्या सूचना मनपाच्या अधिकार्यांना दिल्या. त्यानंतर आता मनपाने शहरात वॉर्डनिहाय पाहणी करून 102 खुल्या जागा शोधून काढल्या आहेत. यातील 57 ठिकाणी पीट कंपोस्टिंग करून ओल्या कचर्याचे खत तयार केले जात आहे. आतापर्यंत सुमारे एक हजार मेट्रिक टन कचर्याचे खत तयार करण्यात आले.

शिवाय ज्या ठिकाणी कचरा डंप झालेला आहे, तेथे त्यावर बायोमायनिंग केले जात आहे. त्यामुळे दुर्गंधी येणार तर नाहीच आणि नागरिकांचे आरोग्य ही धोक्यात जाणार नाही..शहरातील काही संस्थांनी सुका कचरा गोळा करून तो घेण्याची तयारी दर्शवली आहे.