fbpx

बाबा राम रहीमच्या डेऱ्यात भल मोठ घबाड…

gurmeet ram rahim rape case

हरियाणा : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीम याला सीबीआय कोर्टाकडून शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर आता, बाबाचा डेरा म्हणजेच त्याच्या सलतनतीची झाडाझडती सुरु झाली आहे. बाबाच्या मर्जीने ज्या ठिकणी कोणीही जाऊ शकत नव्हते तिथे आज हरियाणा पोलीस आणि जवानांनी डेरा घातला आहे. दरम्यान पोलिसांना आतापर्यत अनेक धक्कदायक गोष्टी मिळून आल्या आहेत.

हरियाणातल्या सिरसामधला हा डेरा ज्याला आपण आश्रम म्हणतो ते एक प्रकारे बाबा राम रहीमचं मुख्यालय होतं. तब्बल 700 एकरमध्ये पसरलेला हा डेरा अनेक ऐशोआरामाच्या साधनांनी सज्ज आहे.

1500 बूट आणि 3000 डिझायनर कपडे
पोलिसांना राम रहीमच्या वॉर्डरोबमध्ये 1500 बूट आणि 3000 डिझायनर कपडे सापडले आहेत.

आलिशान फर्निचर, वॉर्डरोब आणि पलंग
डेऱ्यामध्ये आलिशान फर्निचर, वॉर्डरोब आणि पलंगही सापडले आहेत. अनेक मोल्यवान आणि महागड्या
गोष्टी बाबाच्या आश्रमात सापडत आहेत.

राम रहीमचं स्वत:चं चलन सापडलं
डेऱ्यात राम रहीमनचं स्वत:चं वेगळं चलन सुरु केलं होतं. 1,2,5 आणि 10 रुपये किंमतीचं वेगळं चलन इथं सापडलं आहे. म्हणजे तुम्हाला डेऱ्यात काही खरेदी करायचं असेल तर भारतीय चलन देऊन राम रहीमचं चलन घ्यावं लागायचं.

अलिशान कार
बाबाला अलिशान कार वापरण्याची हौस असून त्याच्या आश्रमातून अनेक अलिशान कार जप्त करण्यात आल्या आहेत