कुणी कुठे जायचं, हे सांगणारे राज ठाकरे कोण?सहगल यांनी राज ठाकरेंना  झापलं

मुंबई : ज्येष्ठ लेखिका नयनतारा यांना 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निमंत्रण देण्यात आलं. पण ते मनसेच्या विरोधामुळे मागे घ्यावं लागल्याची चर्चा आहे. यावर मनसेकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलंय. नयनतारा सहगल यांनी महाराष्ट्रात जरुर यावं, त्यांचं स्वागत आहे, असं मनसेने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय.यानंतर मनसे आणि सहगल यांच्यातील वादावर पडदा पडेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता टीव्ही 9 मराठीशी बोलताना कुणी कुठे जायचं, हे सांगणारे राज ठाकरे कोण? असा सवाल उपस्थित करत सहगल यांनी राज ठाकरे यांना चांगलंच झापलं आहे.

यांना 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र मनसेच्या विरोधामुळे ते निमंत्रण मागे घ्यावं लागलं. हा वाद वाढल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नयनतारा यांना आमचा विरोध नाही. त्यांनी महाराष्ट्रात जरुर यावं, त्यांचं स्वागत आहे अशी सारवासारव ठाकरे यांनी केली होती.

कोण आहेत राज ठाकरे?सहगल यांनी राज ठाकरेंना  झापलं

Loading...

“राज ठाकरे कोण आहेत, जे कुठल्याही भारतीय नागरिकाला हे म्हणतील की, मी तुम्हाला परवानगी देतो आहे येण्याची किंवा मी परवानगी नाही देत. जर हा एक स्वतंत्र देश आहे, तर या देशाच्या प्रत्येक नागरिकाला हा हक्क आहे की तो देशात कुठेही जाऊ शकतो. आपले विचार मांडू शकतो”, असे म्हणत नयनतारा सहगल यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.