fbpx

अयोध्येत पाच नाही तर २५ लाख लोक आम्ही जमवून दाखवू,मुस्लीम संघटनेचा दावा

अयोध्या : उत्तरप्रदेशातील अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणाच्या मागणीदरम्यान एका मुस्लीम संघटनेनं अयोध्येत २५ लाख लोक जमवण्याचा दावा केलाय. मुस्लीम संघटनेच्या म्हणण्यानुसार जर विश्व हिंदू परिषदेनं अयोध्येत पाच लाख लोक जमा केले तर आपण २५ लाख लोक जमवून दाखवू शकतो. सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनेनं हा दावा केलाय.

सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) या संघटनेच्या म्हणण्यानुसार, एसडीपीआयच्या म्हणण्यानुसार, त्यांनी कधीही बाबरी मशिदीवरचा ताबा सोडलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा बाबरी मशिद उभी राहणार… त्यासाठी कायदेशीर लढाई सुरू राहिलं. एसडीपीआय ६ डिसेंबर रोजी दिल्लीत बाबरी मशिदीच्या हक्कासाठी रॅली काढणार आहे.