मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. एकीकडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगली दणक्यात कमाई करताना दिसत आहे. तर अभिनेता अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. त्यामुळे ‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘बच्चन पांडे’ची एकमेकांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होताना दिसत आहे.
काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत काही लोक चित्रपटगृहात गोंधळ घालताना दिसत आहेत. हा व्हिडीओ ओडिसाच्या आयलेक्स चित्रपटगृहातील असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी बच्चन पांडेचे स्क्रिनिंग जबरदस्तीने थांबवण्यात आले. यावेळी ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट लावावा, अशी मागणी प्रेक्षकांनी केली. यामुळे सर्वत्र गोंधळ पाहायला मिळत आहे. ही घटना ओरिसातील संबलपूर येथील आहे. या व्हिडीओत काही लोक घोषणाबाजी करताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या :