संगीत सेवेची ६३ वर्ष : पडद्यामागचा कलाकार साबाण्णा भीमण्णा बुरूड

टीम महाराष्ट्र देशा – गावामध्ये नाटक आले होते. ते बघायला गेल्यावर त्या नाटकात साहित्याला हात लावला म्हणून, तेथील कलाकाराने फटकारले. या साहित्यत असे काय आहे? की त्या कलाकाराने मला फटकारले.हा राग मनात धरून. त्याने लहानपणी ठरवले की याचा शोधा घेयाचा.ज्या वस्तूला हात लावला म्हणून फटकारले होते.

आज त्याच वस्तूंची हार्मोनियमची निर्मिती पुढे तो करू लागला.अशी निर्मिती करू लागला की संगीत क्षेत्रातील दिग्गज त्याच्याकडून हार्मोनियम बनवून घेऊ लागले.तो म्हणजे साबाण्णा भीमण्णा बुरूड.जनवाडी-जनता वसाहत,गोखलेनगर येथे राहणारा मनस्वी कलावंत. मागील ६३ वर्ष संगीत सेवेचा ध्यास घेऊन १८ तास काम करून तो हार्मोनियम बनवतो. वयाच्या ७९ व्या वर्षी देखील हार्मोनियम निर्मिती आणि दूरूस्ती करण्यात हातखंडा आसलेला हा पडद्यामागचा कलावंत त्यांच्यासारखा हार्मोनियम बनवावा तर त्यांनीच.

Loading...

ते सांगतात सुरवातीला पुण्यात आल्यावर फुटपाथवर रात्री झोपून ३ महिने काढले.पुण्यात मिरजकर यांच्या दुकानात काम करून, नंतर स्वत घरीच वाद्य दुरुस्ती करू लागले.अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली आसतांना तेथील भाषा आपणास येत नाही,म्हणून तेथे जाऊन काय करायचे त्यापेक्षा आपल्या भूमीत राहून येथेच चांगले काम करायचे त्यांनी ठरवले.

वयाच्या १४ वर्षी संगीत सेवेचा ध्यास घेऊन उतरलेला माणूस आज अविरतपणे वयाच्या ७९ व्या वर्षी देखील उत्तम तंतूवाद्याची निर्मिती करत आहे.सुधीर फडके, राम कदम, वसंत पवार, पंडित भीमसेन जोशी, अशा मातब्बर कलाकारांना त्यांनी सेवा दिली.अभिजात संगीताच्या प्रचारार्थ कार्यारत असलेल्या गनवर्धन संस्थेतर्फे वाद्यदुरूस्ती क्षेत्रात कार्यरत असलेल्या साबाण्णा भीमण्णा बुरूड यांना वाद्य कारागीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुणे शहराची ओळख शैक्षणिक राजधानी त्याच बरोबर कला क्षेत्राचाही खूप मोठा इतिहास या शहराला आहे येथेच अनेक दिग्गज कलावंत घडले.

कला क्षेत्रात संगीताला खूप महत्त्व आहे. संगीत क्षेत्रात तंतूवाद्या हार्मोनियम म्हणजे संगीताचा ‘स्वर’या स्वरांशिवाय संगीत कसे पूर्ण होणार?तंतूवाद्याची निर्मिती करणारा आजही आपल्या कुटुंबासोबत राहून तंतूवाद्याची निर्मिती करतो.पडद्याआड आसलेला कलाकार,ज्याने स्वताला संगीत क्षेत्रात झोकून दिले. अशा कलाकारांशिवाय कोणतीच कला पूर्ण होऊ शकत नाही, हे सिध्द होतो.माणूस जिद्दीने पेठला तर काय करु शकतो. याचं जीवंत उदाहरण म्हणजे साबाण्णा भीमण्णा बुरूड होय.

खूप नामवंत गायक, वादक,साबण्णा बुरूड यांच्याकडून हार्मोनियम/आँर्गन तयार करून नेतात.त्यांनी केलेल्या कामाचा दर्जा उत्कृष्ठ आहे.संगीत क्षेत्राची अविरतपणे सेवा करणारा माणूस.
-(जयराम पोतदार – जेष्ठ हार्मोनियम वादक)

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
मराठा क्रांती मोर्चाचा पहिला बळी ' मी ' ठरलो : आमदार भारत भालके
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
रडत राऊतांमुळे यापुढे सामना बंद,बंद,बंद : मनसे
माझं कुणी काहीच ' वाकडं ' करू शकत नाही : संजय राऊत