SCO च्या 8 आश्चर्यांमध्ये भारतातील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चा समावेश

टीम महाराष्ट्र देशा : जगातला सर्वात उंच पुतळा म्हणजेच गुजरातमधले ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ याचा शंघाई सहकार संघटना (SCO) यांच्या ‘8 वंडर्स ऑफ SCO’ या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. सदस्य राष्ट्रांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी SCOने हा पुढाकार घेतला आहे.

इतर सात आश्चर्य :

Loading...

1. तमगलीचा भूप्रदेश (Archaeological Landscape of Tamgaly), कझाकस्तान

2.डॅमिंग पॅलेस, चीन

3.इसिक-कुल तलाव, किर्गिस्तान

4.मुघल घराण्याचा वारसा, पाकिस्तान

5.गोल्डन रिंग, रशिया

6.कोही नवरोझ पॅलेस, ताजिकिस्तान

7.बुखाराचे ऐतिहासिक केंद्र, उझबेकिस्तान

स्टॅच्यू ऑफ युनिटी :

गुजरात राज्यात केवडिया येथे “स्टॅच्यू ऑफ युनिटी” या नावाने भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा 182 मीटर (597 फूट) उंचीचा आहे. हा नर्मदा नदीच्या किनारी उभारण्यात आलेला जगातला सर्वाधिक उंचीचा पुतळा आहे.

हा पुतळा राजपिपळा शहराजवळ नर्मदा धरणाजवळच्या साधू बेटावर उभारलेला आहे. ही शिल्पाकृती जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी साकारली. विक्रमी 33 महिन्यांमध्ये पुतळ्याचे बांधकाम केले गेले.

शंघाई सहकार्य संघटना (SCO)

शांघाय सहकार्य संघटना (Shanghai Cooperation Organisation – SCO) याची स्थापना 2001 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय चीनच्या बिजींग या शहरात आहे. SCO मध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे. चीन हा याचा संस्थापक देश आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...