भारतात अद्याप शाळा सुरु होणार नाहीत ; नवाजुद्दीन सिद्दीकी पत्नी व मुलांसोबत दुबईत शिफ्ट

navjudhin

मुंबई : कोरोना रोगाने गेल्यावर्षीपासून देशासह जगभरात थैमान घातला आहे. अनेक देश या रोगातून सावरत असून भारताला दुसऱ्या लाटेचा फटका बसला. कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्याहून अधिक भयंकर होती. या लाटेचे सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात दिसून आले. राज्यातील स्थिती आता आटोक्यात येत असून अद्यापही अनेक जिल्ह्यांमध्ये चिंता कायम आहे. अशा स्थितीत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मुलांचे शिक्षण आता आणखीन काही काळ ऑनलाईनचं सुरू राहणार आहे.

याच पार्श्ववभूमीवर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने दुबईत शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. या विषय बोलताना नवाजुद्दीन म्हणाला, आम्ही दुबईमध्ये शिफ्ट होत आहोत. कारण, आम्ही आमच्या दोन्ही मुलांना तिकडेच शिक्षण देणार आहेत. भारतात सध्या ऑनलाइन शाळा सुरु आहेत. येत्या काही वर्षापर्यंत ही परिस्थिती बदलेल, असे वाटत नाही. त्यामुळे आम्ही मुलांना दुबईमधील शाळेत टाकले आहे. घरी बसून शिकणे आणि शाळेत जाणे, यात बराच फरक आहे. त्यामुळे आम्ही लवकरात लवकर दुबई जाण्याचा प्रयत्न करत आहोत.

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया यांच्या वैवाहिक आयुष्यातील वाद आता मिटला असून ते पुन्हा एकत्र आले आहेत. मागील वर्षी या दोघांमधला वाद इतका विकोपाला पोहोचला होता की, प्रकरण घटस्फोटापर्यंत आले होते. पण आता हे दोघे एकत्रित आहेत. आणि लवकरच आपल्या मुलांसोबत दुबईत शिफ्ट होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या