fbpx

शाळा बंद नाहीत तर इमारती बंद!- विनोद तावडे

vinod tawade

टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील१३०० मराठी शाळा बंद पडणार. यासंदर्भात बोलतांना तावडे म्हणाले,‘पटसंख्या कमी असलेल्या अनेक शाळा राज्यात आहेत. अशा शाळांतील विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेमध्ये शिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे, शाळा बंद केलेल्या नाहीत, तर इमारती बंद झाल्या आहेत.’ असे स्पष्ट केले.

राज्यातील १३०० शाळा बंदचा निर्णय घेतल्यामुळे शिक्षणमंत्री तावडे व राज्य सरकारवर टीका होत आहे. याबाबत अनेक पालकांनी सरकारला निवेदन देखील दिल आहे. शाळा बंद केलेल्या नाहीत, तर इमारती बंद झाल्या आहेत अस तावडेंनी स्पष्ट केलं आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा अशी मागणी होत असतांना. मराठी भाषेच्या वापरासाठी आग्रह जरूर असला पाहिजे, मात्र मराठी भाषेच्या वापराची सक्ती करता येणार नाही. त्यामुळे आग्रह करून मराठीचा वापर वाढवण्यावर राज्य शासनाचा भर राहणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.