उन्हाळी सुट्टयांनंतर १५ जूनपासून विद्यार्थ्यांविना शाळा होणार सुरु!

औरंगाबाद : कोरोना महामारीमुळे मागील वर्षापासून शाळा महाविद्यालय बंद आहेत. उन्हाळी सुट्टयांनंतर आता १५ जूनपासून शाळा सुरु आहेत. परंतु शाळेत फक्त शिक्षक आणि कर्मचारी असणार आहेत. विद्यार्थ्यांना घरी बसूनच ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागणार आहे. मात्र विद्यार्थ्यांना शाळेत कधी प्रवेश मिळेल याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान बालकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शाळा प्रत्यक्षात सुरु होण्यास बराच कालावधी लागू शकतो.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्या दिड वर्षांपासून शाळा, महाविद्यालय बंद आहे. मात्र शाळांमधून ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरु आहे. त्यामुळे शिक्षकांना शाळेत येणे बंधनकारक आहे. सोमवारी १४ जूनला शिक्षकांच्या हजेरी बाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार असून पत्र सुद्धा देण्यात येणार आहे. विद्यार्थी जरी शाळेत येणार नसेल तरी शिक्षकांना शाळेत यावे लागणार आहे.

शाळेत कोरोना पासून बचावासाठी निर्जंतुकीकरण करणे, स्वच्छता राखणे, हँड सॅनिटाइजरचा वापर करणे या सर्व नियमांचे पालन करुन माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम राबविण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित, शासकिय, जिल्हा परिषद, खाजगी त्याचबरोबर ४ हजार ५५५ शाळांना सुरुवात होणार आहे. विद्यार्थी शाळेत येणार नसले तरीही तरीही शाळेत नवीन प्रवेश देणे, उत्तीर्ण विद्यार्थ्यांना टिसी देणे, आधार अपडेट करणे सुरु राहणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IMP