राज्यातील शालेय विद्यार्थांना आता १ मे नंतरच उन्हाळी सुट्टी

मुंबई: राज्यातील शालेय विद्यार्थांना आता १ मे नंतरच उन्हाळी सुट्टी मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्या प्राधिकरणाने तसा शासन निर्णय काढला आहे. काही शाळांतील परीक्षा मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होतात. तर काहींच्या २० एप्रिलपर्यंत संपतात. त्यानंतर विद्यार्थी शाळेत न येता थेट निकालाला शाळेत जातात. त्यानंतर शाळेला उन्हाळी सुट्टी सुरु होते.

शालेय विद्यार्थांची एप्रिलमध्ये जरी वार्षिक परीक्षा संपली तरी शाळेत जावं लागणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्या प्राधिकरणाने तसा शासन निर्णय काढला आहे. विद्यार्थांना आता ३० एप्रिलपर्यंत शाळेत जावे लागणार आहे. एप्रिल महिन्यातील परीक्षा संपल्यानंतर शाळांमध्ये उन्हाळी शिबीरं, विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. सरकारने तसे आदेश शाळांना दिले आहेत.

You might also like
Comments
Loading...