fbpx

शाळा बंद होण्याच्या अफवेमागे राजकीय खेळी ; विनोद तावडे

Vinod_Tawde

मुंबई : राज्यातील ८० हजार शाळा बंद होणार नाहीत, शाळा बंद होण्याच्या अफवेमागे राजकीय खेळी असल्याच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी टि्वटरवरून स्पष्ट केल. शिक्षण विभातील अधिकारी, केंद्रप्रमुखांच्या बैठकीसाठी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार हे औरंगाबादमध्ये आले असता त्यांनी शाळा बंध संदर्भात बोलतांना सरकारचे पुढील धोरण १५ वर्षांत राज्यातील ८० हजार सरकारी शाळा बंद करून ही संख्या ३० हजारांवर आणण्याचे आहे असे स्पष्ट केले होते.

राज्यांतील १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता कमी गुणवत्ता आणि शाळांची घसलेली पटसंख्या या कारणास्तव राज्य सरकारनं हा निर्णय घेतल्याच कारण सरकार कडून स्पष्ट करण्यात आल होत. डिसेंबर महिन्यापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी देखील करण्यात आली. सरकराच्या या निर्णयाने शिक्षण क्षेत्रात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. हा निर्णय शिक्षण हक्क कायद्याचा भंग करणारा असल्याचे मत शिक्षणक्षेत्रात व्यक्त होत आहे. तसेच अनेक पालकांकडून सुद्धा या निर्णयाचा विरोध झाला. त्यामुळे राज्यातील ८० हजार शाळा बंद होणार म्हणून खळबळ उडाली होती. मात्र हि अफवा असल्याच विनोद तावडे यांनी स्पष्ट केल आहे.