औरंगाबाद : शहरात कोरोनाचे रूग्ण वाढतांना दिसत आहेत. त्यामुळे महापालिकेने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. १८ फेब्रुवारी रोजी १०, १२ वी वगळता इतर सर्व वर्गांना सुट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज पुन्हा एकदा या निर्णयात फेरफार करत २८ फेब्रुवारी पर्यंत १० वी १२ वी वगळता संपूर्ण शाळा सक्तीने बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशाने हा निर्णय घेण्यात आला. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना याविषयी सांगितले. सध्या शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
१८ तारखेला घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत १० वी आणि १२ वीचे वर्ग वगळता इतर वर्ग विद्यार्थ्यांना येत्या २८ फेब्रुवारी पर्यंत सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी विद्यार्थी आणि पालकांसाठी हा निर्णय ऐच्छिक ठेवण्यात आला होता.
मात्र शहरात वाढणारी रुग्णसंख्या पाहता महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी १० आणि १२ वी चे वर्ग सोडून इतर सर्व वर्गाना सक्तीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी एकत्रित येऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचे पांडेय यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- कोरोनाचा उद्रेक, घाटीत गेल्या २४ तासात एकालाही डिस्चार्ज नाही
- खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यूने खळबळ ; कोण होते खासदार मोहन डेलकर ?
- पेट्रोलचे नवे भाव, २५ ला पाव!
- मनपा अधिकाऱ्यांना ‘फोन करो’ आंदोलन