आपल्यापेक्षा शाळेतील मुले तरी बरी, संसदेतील गदारोळाबद्दल महाजन यांनी व्यक्त केली नाराजी

टीम महाराष्ट्र देशा– गदारोळाबद्दल अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी लोकसभेची ओळख गदारोळाचे ठिकाण अशी होत चालली आहे, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. मंगळवारी महाजन यांनी खासदारांना फटकारले होते.  आपल्यापेक्षा शाळेतील मुले तरी बरी, असे त्यांनी म्हटले होते.

दरम्यान, अध्यक्षांनी गदारोळावरून आचारसंहिता समितीची बैठक बोलावली आहे. ही समिती खासदारांच्या आचरणाचे परिक्षण करण्याचे काम करते. या समितीमध्ये सर्वच पक्षांचे सदस्य आहेत.

महाजन म्हणाल्या की, गदारोळामुळे वारंवार कामकाजात अडथळे येत असल्याने लोकसभेची प्रतिमा खराब झाली आहे. गदारोळ घालण्याचे स्थान अशी तसेच जेथे काही विचारले जाऊ शकत नाही आणि काहीही ऐकले जात नाही, अशी या सभागृहाची ओळख होत चालली आहे.

You might also like
Comments
Loading...