शिवसेनेच्या कोणत्याही वक्तव्याला शाळकरी मुलेही गांभीर्याने घेत नाहीत : मुंडे

टीम महाराष्ट्र देशा – शिवसेनेच्या कोणत्याही वक्तव्याला शाळकरी मुलेही गांभीर्याने घेत नाहीत. अयोध्येला गेलेले ठाकरे हात हलवत परत आले. शिवसेना सत्तेसाठी लाचार असल्यानेच पाच वर्ष मंत्रिपदावर खुश आहे. सेना-भाजप राज्यातील दुष्काळासारखे गंभीर प्रश्नावरील लक्ष हटविण्यासाठी भांडायचे नाटक करीत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. ते पंढरपुरात बोलत होते.

दरम्यान मुंडे यांनी भाजपवर देखील टीका केलं. खोटी आश्वासने देऊन भाजपने देशात आणि राज्यात सत्ता मिळवली. त्यामुळे पाच वर्षात फक्त सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे लाटेत निवडून आलेल्या सरकारमधील आमदार आणि खासदार पुन्हा सभागृहात दिसणार नाहीत. त्यासोबत 12 डिसेंबर नंतर राष्ट्रवादीमधून बाहेर गेलेल्या नेत्यांची घरवापसी सुरु होईल, असही भाकीत देखील मुंडे यांनी केले.

चंद्रकांत पाटील यांच्या बेताल वक्तव्यांमुळेच मराठा आंदोलन चिरघळले – शेट्टी