पीएचडीसाठी आरआरसीसमोर सादरीकरणाचे वेळापत्रक घोषित; पदवी, पदव्युत्तरच्या फेरपरीक्षाही जाहीर

dr. bamu

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेसाठी आरआरसीसमोर सादरीकरणाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. फेज २ मध्ये ऑनलाइन नावनोंदणी करून मुदतीत संशोधन अहवालाची प्रत विद्यापीठाच्या पीएच.डी. विभागात सादर केली. त्यापैकी पहिल्या टप्प्यात चार विद्याशाखेच्या ११ विषयांच्या विद्यार्थ्यांचे संशोधन व मान्यता समिती (आरआरसी) समोर १५, १६, १८ सप्टेंबर रोजी मुलाखती आणि सादरीकरण होणार आहे.

वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेंतर्गत १५ सप्टेंबर रोजी पर्यटनशास्त्र ६ उमेदवार, १६ सप्टेंबर रोजी वाणिज्य ४० उमेदवार, तर १८ सप्टेंबर रोजी वाणिज्य विभागाचे ४१ ते ७५ उमेदवार, मानव्य विज्ञान विद्याशाखा (भाषा) संस्कृत १५ सप्टेंबर रोजी १० उमेदवार, उर्दू १० उमेदवार, १८ सप्टेंबर रोजी हिंदी ३० उमेदवार, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील १५ सप्टेंबर रोजी फुड टेक्नॉलॉजी विषयाचे १४ उमेदवारांचे सादरीकरण होणार आहे.

तसेच १६ सप्टेंबर रोजी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरींगचे ४२ उमेदवार, १८ सप्टेंबर रोजी फार्मसीचे १ ते ६० उमेदवार, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अंतर्गत १५ सप्टेंबर रोजी ललीत कला २१ उमेदवार, नाट्यशास्त्र २६ उमेदवार यांचे आरआरसीसमोर सादरीकरण सकाळी साडे दहा ते साडेपाच वाजेदरम्यान विद्यापीठात होणार आहे.

दरम्यान, विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर परीक्षा देताना गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा २० ते २२ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे परीक्षा व मूल्यमापन विभागाने परिपत्रकात म्हटले आहे.

असे असेल वेळापत्रक

सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे सर्व विषय २९ ते ११ ऑगस्ट झालेल्या परीक्षेचा कालावधीतील पुनर्परीक्षेची नवीन तारीख २० सप्टेंबर २०२१ आहे. १२ ते २६ ऑगस्ट दरम्यान झालेल्या परीक्षेचा कालावधीतील पुनर्परीक्षा २१ सप्टेंबर रोजी होईल. २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान झालेल्या परीक्षेचा कालावधीतील पुनर्परीक्षा २२ सप्टेंबर रोजी होईल. या परीक्षा केवळ ऑनलाईन माध्यमातून घेण्यात येणार आहे. परीक्षा सकाळी ९ ते सायंकाळी ८ या वेळेत होईल. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी दोन वेळा परीक्षा देऊ नये. दोनदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल घोषित होणार नाहीत, असे विद्यापीठाने कळविले आहे.

महत्त्वाच्या बातम्या