fbpx

‘लोकसभेला विलास लांडेंना करणार बळीचा बकरा’

टीम महारष्ट्र देशा – शिरूर लोकसभेला राष्ट्रवादीकडून माजी आमदार विलास लांडे यांनाच मैदानात उतरवल जाणार असल्याची चर्चा सध्या जोरात आहे.विलास लांडे यांची उमेदवारी फायनल झाली असल्याची माहिती समोर येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर गिरीश बापट यांनी विलास लांडेंवर टीका केली आहे.

राष्ट्रवादीकडून विलास लांडेंना उमेदवारी म्हणजे त्यांना बळीचा बकरा करण्याचे ठरले आहे, अशी टीका अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी विलास लांडेंवर केली आहे.

यावेळी बापट म्हणले, २०१४ लोकसभा निवडणुकीवेळी कुठेही न दिसणारे विलास लांडे अचानक फ्लेक्सवर प्रश्न विचारत आहेत. हा विलास इतक्या वर्ष कुठे होता? त्याला इतके प्रश्न कसे आठवले?