तुकाराम मुंढेंवर २० कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप, पोलिसांत तक्रार दाखल

नागपूर: धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळख असणारे तुकाराम मुंडे यांच्यावर २० कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर करण्यात आला आहे. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी मुंढे यांच्यावर आरोप करतानाच पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुंढे यांनी ‘स्मार्ट सिटी’मध्ये 20 कोटींचा घोटाळा केला तसेच मर्जितल्या कंत्राटदारांना परस्पर कंत्राट दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. महापौर संदीप जोशी आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यामध्ये वाद टोकाला गेला आहे. दोन दिवसांपूर्वी व्यक्तिगत प्रतिमाहनन केल्याचा आरोप करत मुंडे यांनी सभात्याग केला होता. तर मुंढे हे फोन उचलत नसून मेसेजला रिप्लाय देखील देत नसल्याचा आरोप महापौरांनी केला होता.

बोगस बियाणे विकणार्‍या महाबीजवर कारवाई करा – देवेंद्र फडणवीस

दरम्यान आता तुकाराम मुंढे यांनी इतर दोन अधिकाऱ्यांसोबत मिळून पदाचा गैरवापर केला असून जबरदस्तीने 20 कोटी रुपये ट्रान्सफर केले असल्याचं जोशी यांनी माध्यमांना सांगितले आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या आमसभेत शनिवारी जोरदार गोंधळ झाला. सभेची सुरुवात होताच भाजप नगरसेवक मुंढेंविरोधात आक्रमक झाले. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी मोठ्या आवाजात मुंढे यांच्यावर हल्ला चढवला, तर कॉंग्रेस नगरसेवक हरीश ग्वालबंशी यांनी मुंढे हे तुकारामाच्या नावावर कलंक असल्याचे अपशब्द वापरले.

सर्वांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने कोरोनावर मात करण्यात यशस्वी – मुंडे

मुंढे यांनी तात्काळ जागेवरुन उठत नगरसेवकांकडून वापरल्या जाणाऱ्या भाषेवर आक्षेप घेतला. जर नगरसेवक आवाज चढवून बोलणार असतील तर मी इथे बसणार नाही, असे म्हणत मुंढे यांनी सभागृहातून काढता पाय घेतला. मुंढे यांच्या सभागृहातून निघून जाण्यावर तिथे गोंधळ झाला.