‘स्कॅम १९९२’ फेम प्रतिक गांधी आता झळकणार ‘या’ चित्रपटात

prtik

मुंबई : सिख्या एंटरटेंमेंट या निर्मिती संस्थेने तयार केलेल्या ‘शिम्मी’ चित्रपटात ‘स्कॅम १९९२’ फेम अभिनेता प्रतिक गांधी यांची मुख्य भूमिका आहे. त्यांचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

शिम्मी ही जिला आपल्या आयुष्यात नेमके तिच्या वडिलांच्या (प्रतिक गांधी) आयुष्याची गोष्ट आहे. या चित्रपटात भामिनी ओझा गांधी यांचीदेखील महत्वपूर्ण भूमिका आहे. ‘अ डेथ इन द गंज’ या चित्रपटाची सहलेखिका आणि भारतीय रॅपर नेझी यांच्यावर आधारित ‘बोम्बे ७०’ या पुरस्कार प्राप्त माहितीपटाची लेखिका व दिग्दर्शिका असलेल्या दिशा नोयोनिका रिन्दानी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

पगलेट, द लंचबॉक्स आणि मसान सारख्या काही नावाजलेल्या चित्रपटाचे निर्माते असलेल्या गुणित मोंगा आणि अचिन जैन यांच्या सिख्या एंटरटेंमेंट अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन १७ सप्टेंबरला मिनीटीव्ही या अमेझॉनच्या अॅपवर होणार आहे. भारतातील लाखों प्रेक्षकांना मोफत पाहता येणाऱ्या अनेक आगामी चित्रपटांची घोषणा देखील येत्या काही महिन्यांत करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या