मोठी बातमी : मराठा आरक्षणाचं उद्या ठरणार ! सर्वोच्च न्यायालय निकाल देणार

दिल्ली : गेले अनेक वर्षे मराठा समाज आरक्षणासाठी संघर्ष करत आहे. मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा अशा आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणास मंजुरी दिली होती. मात्र, यानंतर विरोध करत याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सर्वोच्च न्यायालायने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभरातील मराठा समाज हा आक्रमक झाला होता. विविध आंदोलने, निदर्शने यातून समाजाने तीव्र संताप व्यक्त करून राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य भूमिका मांडावी अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान, उद्या म्हणजेच ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालय या आरक्षणावर अंतिम निकाल देणार आहे.

यामुळे राज्यातील नागरिकांसह देशाचं या ऐतिहासिक निकालाकडे लक्ष लागलं आहे. उद्या सकाळी साडे दहा वाजता सर्वोच्च न्यायालय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने 26 मार्चला निकाल राखून ठेवला होता. आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादेवर उद्या निकाल दिला जाणार आहे. 1992 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्के आरक्षण मर्यादा घालून दिली होती. त्यामुळे उद्या मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेणार ? हे महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या